बंद

अल्पसंख्याक विभागाच्या योजनांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 18/06/2019

औरंगाबाद,दि.17 (जिमाका) – अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा विकास, डॉ. जाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनांचे प्रस्ताव 31 ऑगस्टपर्यंत सादर करावेत. शासन निर्णय व आवश्यक कागदपत्रांची यादी https://mdd.maharashtra.gov.in या संकतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले आहे.

******