बंद

अल्पसंख्यांक शाळेच्या सुविधेसाठी संस्थाचालकानी प्रस्ताव सादर करावेत- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 10/02/2022

 औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका) : अल्‍पसंख्‍यांक विकास विभाग महाराष्‍ट्र शासन यांचे परिपत्रक क्र. अविवि-२०२१ / प्र.क्र.६८/का.६ दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ अन्‍वये सन २०२१-२२ या वर्षासाठी जिल्‍हयात अल्‍पसंख्‍यांक बहुल शासनमान्‍य खाजगी शाळाकनिष्‍ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थानगरपालिका व नगर‍परिषद शाळा व अपंग शाळांमध्‍ये पायाभूत सुविधा पुरविण्‍यासाठी अनुदान योजना राबविण्‍याबाबत कळविले आहेत. सदर योजनेअंतर्गत प्रस्‍ताव सादर करण्‍याकरिता अल्‍पसंख्‍यांक विकास विभागशासन निर्णय अविवि-२०१५/प्र.क्र.८०/१५/का.६ दिनांक ०७.१०.२०१५ व आवश्‍यक कागदपत्राची यादी https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. इच्‍छुक संस्‍थाचालकांनी शाळांचे परिपुर्ण प्रस्‍ताव उपरोक्‍त शासन निर्णयातील अटी व शर्ती नुसार जिल्‍हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर करावेत.