बंद

अमडापूर वाघुंडी, हिराडपुरी, सोनवडी, हिमायतबाग सतर्क क्षेत्र घोषित

प्रकाशन दिनांक : 20/01/2021

औरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका): प्राण्यांमधील संक्रमन व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रन अधिनियम 2009 व Action Plan for Prevention,control & contamination of Avian Influenza (revised 2021) नुसार अमडापूर वाघुंडी (गुटेवाडी) ता. पैठण, हिराडपुरी ता. पैठण, सोनवाडी ता. पैठण या गावात आणि शहरातील हिमायतबाग सतर्क क्षेत्र (Allert zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात कुकुट पक्षांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध लावण्यात येत आहे, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्गमित केले आहे.