बंद

अंत्योदय अन्न योजनेसह इतर योजनांचे नियतन प्राप्त धान्याचे वाटप 31 जुलै पर्यंत

प्रकाशन दिनांक : 10/07/2020

औरंगाबाद (जिमाका) दि 8:
औरंगाबाद जिल्ह्यासाठी जुलै महिन्याचे अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना आणि एपीएल शेतकरी योजनेचे नियतन प्राप्त झालेले असून या सर्व योजनांच्या अन्नधान्याची उचल झालेली आहे . तसेच या सर्व योजनांचे धान्य जवळपास सर्व दुकानांवर पोहोचलेले आहे असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने कळविले आहे.
जुलै महिन्यासाठीच्या या सर्व योजनांचे धान्याचे वाटप 31 जुलै पर्यंत होणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा प्रति लाभार्थी पाच किलो तांदूळ व प्रति कुटुंब एक किलो दाळ मोफत देण्याबाबत शासन आदेश प्राप्त होत आहेत .त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे मोफत तांदूळ वाटप होणार आहे. कराेना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिनांक 31 जुलै पर्यंत अन्नधान्याचे वितरण करतेवेळी ई-पाॅस मशीनवर लाभार्थ्यांचा अंगठा न घेता रास्त भाव दुकानदार यांचाच अंगठा प्रमाणित करणेबाबत आदेश निर्गमित केलेले आहे. माहे जुलै महिन्याचे धान्य वितरण 31जुलै पर्यंत होणार आहे,त्यामू्ळे लाभार्थ्यांनी एकाचवेळीB गर्दी नकरता ,फिजीकल डिस्टन्स ठेवावे,तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांनी पल्स ऑक्सिमिटरचा आणि थर्मल स्कॅनिंग चा वापर करावा ,असे निर्देश देण्यात आले आहेत.